Top News मनोरंजन

‘बिग बॉस14’ मधील पिस्ता धाकडचा व्हॅनिटी व्हॅनखाली चिरडून मृत्यू

मुंबई | प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसच्या सेटवरून मोठी बातमी येत आहे. बिग बॉस शोची टॅलेंट मॅनेजर पिस्ता धाकड हिचे एका अपघातात दुर्दैवी निधन झालं आहे.

बिग बॉस शोच्या सेटबाहेरच हा अपघात झाल्याची माहिती समजत आहे. ‘वीकेंड का वॉर’च्या शूटींगनंतर पिस्ता तिच्या दुचाकीने घरी जात होती. रात्रीच्या अंधारात तिची स्कुटी स्लिप होऊन रस्त्यावरच्या खड्ड्यात गेली आणि मागून आलेल्या व्हॅनिटी व्हॅनने तिला चिरडलं.

अपघातात गंभीर दुखापत झाली झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने पिस्ताचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ‘बिग बॉस 14’च्या सेटवर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, पिस्ता 24 वर्षांची होती. बिग बॉससोबतच तिने खतरों के खिलाडी या टीव्ही शोमध्ये देखील काम केलं आहे. पिस्ताच्या अचानक जाण्याने कलाकांरानी दु:ख व्यक्त केलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्रातील सर्वच पुढाऱ्यांनी औरंगजेबाचा रक्तरंजित इतिहास पुन्हा वाचयला हवा”

“योगी आदित्यनाथ यांना माझ्यापेक्षा उत्तम मुख्यमंत्री मानतो”

‘सर तुम्ही पेलाय’! गाडीला धडकी दिली म्हणून मांजरेकरांनी मारली चापट

“औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात एकपण शहर नको, ही शिवभक्ती म्हणा नाहीतर इतिहासाचा भान”

“मुस्लिम व्होट बँक दुरावेल या भीतीपोटीच काँग्रेसचा नामांतराला विरोध”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या