बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“थोडीशी माणुसकी असेल तर अण्णा हजारेंनी सरकार विरोधात आंदोलन करून दाखवावं”

मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे नेहमी कोणत्या ना कोणत्या मुद्यावर उपोषण करत असतात. जर आता अण्णांकडे थोडीशी माणुसकी असेल तर अण्णांनी सरकार विरोधात आंदोलन करून दाखवावं, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांंनी अण्णांना केलं आहे. एका जाहीर सभेत ते बोलत होते.

NRC, CAA आणि NPR कायद्याविरोधात चाललेला लढा आता तीव्र होणार असून दिल्लीच्या जंतरमंतरवर येत्या 4 मार्च रोजी आंदोलनाला सुरवात होणार आहे. यामध्ये अण्णांनीही सहभागी व्हावं, असं अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

या सरकारचा जगभरात विरोध होत असून कोट्यावधी भारतीय जे परदेशात राहत आहेत. ते या सरकारवर नाराज असल्याचं प्रकाश आंबेडकर सागितलं.

दरम्यान, अण्णा हजारेंच्या या आंबेडकरांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसंदर्भातील अफवांनी कोल्हे संतापले

…नाहीतर राजीनामे देऊ; शिवसेना नगरसेवकांचा उद्धव ठाकरेंना इशारा

महत्वाच्या बातम्या-

माझ्या जीवाला धोका आहे असं म्हटलंच नाही; आव्हाडांच स्पष्टीकरण

काँग्रेसच्या मार्गाने गेलो असतो तर देशाने कधीच प्रगती केली नसती- नरेंद्र मोदी

हेलिकॉप्टर घ्यायचंय तेही कष्टाच्या पैशातून- रोहित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More