बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान ! महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाने दुसरा बळी घेतला आहे. मुंबईत 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोना फोफावत चालला आहे.

राज्यात कोरानाबाधित रुग्णांचा आकडा आता 74 वर पोहोचला आहे. तर संपूर्ण देशभरात 300 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत कोरोनाबाधितरुग्णांची संख्या 64 होती. मात्र आज ही संख्या 74 वर पोहोचली आहे.

मृत व्यक्ती परदेशातून आली होती. या व्यक्तीवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. अखेर आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुंबईत आज नव्याने 6 तर पुण्यात 4 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

दरम्याम, याआधी कोरोनाचा पहिली बळी  मुंबईतील कस्तुरबामध्ये 64 वर्षाच्या पुरूषाचा मृत्यु झाला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

तुला मला का भेटायचं होतं?; राज ठाकरेंच्या प्रश्नावर चिमुकलीचं गोंडस उत्तर, पाहा व्हिडीओ

“आम्ही उपाशी आहेत की नाही हे जनता ठरवेल मात्र तुम्ही नेहमी कुपोषित दिसता”

महत्वाच्या बातम्या-

…अन् तेव्हापासून आईनं माझं नावं दगडू असं ठेवलं- सुशीलकुमार शिंदे

घाबरू नका फोन करा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा कोरोनासाठी नवीन हेल्पलाईन नंबर जारी!

संभाजीराजेंनी माजी लष्करप्रमुखांना सांगितला मराठ्यांचा गौरवशाली इतिहास; त्यावर ते म्हणाले मला तो फोटो द्या!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More