नवी दिल्ली | पाकिस्तानच्या किकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. आता काही दिवसांमागे त्याने भारताविरूद्ध वादग्रस्त वक्तव्य करत टीकेचा धनी बनला होता. मात्र अशातच आफ्रिदी पुन्हा एकदा बरळला आहे.
भारतीय हद्दीत असलेल्या काश्मीरमध्ये स्थानिक लोकांवर अत्याचार होत असून अत्याचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या जात असल्याचं शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे. काश्मीर प्रीमियर लीगचा ब्रँड अँबसेडर आफ्रिदी असल्याची माहिती आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये क्रिकेट अकादमी सुरु करण्यासाठी आफ्रिदी उत्सुक आहे.
काश्मिरी लोकांवरचा हा अन्याय थांबवणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र एक दिवस नक्की असा येईल, ज्या दिवशी काश्मीर स्वतंत्र होईल, असंही आफ्रिदीने म्हटलं आहे. आफ्रिदीच्या अगोदर गोलंदाज शोएब अख्तरने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
दरम्यान, आम्ही आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर भारतावर हल्ला करू, असं शोएब अख्तरने म्हटलं होतं.
थोडक्यात बातम्या-
सायरस पुनावाला यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं- बाळा नांदगावकर
भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात
“संजय राऊत यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा”
‘सत्ता विश्वासघाताने मिळवता येते पण…’; भाजपची शिवसेनेवर टीका
आंतरराष्ट्रीय विमानांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा निर्णय