Top News क्राईम जळगाव महाराष्ट्र

बॅंकेत कर्मचारी सांगून केलं लग्न पण डोळ्याअंधारी करायचा ‘हे’ उद्योग

Photo Credit - Pixabay

जळगाव | जळगाव येथे एका तरूणाने बँकेत कर्मचारी असल्याचं सांगून मुलीच्या कुटुंबियांची फसवणुक करून लग्न केल्याची घटना घडली आहे. विवाह करणारा तरुण हा बँकेत कर्मचारी नसून बँक परिसरात चोरी करणारा चोर असल्याचं समोर आलं आहे. संबंधित आरोपीचं नाव राहुल चौधरी असून त्याने पूर्वी बीएसएफमध्ये नोकरी करीत होता असं सांगितलं होतं.

नोकरी सोडून आता एका खासगी बँकेत कर्मचारी असल्याचं भासवून या तरूणाने मुलीसोबत विवाह केला होता. लग्नानंतर दोन वर्षांपर्यंत सगळ्यांना बँकेत कर्मचारी असल्याचं वाटत होतं. मात्र चोरी करताना पकडला गेल्यानंतर लोकांनी त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली आणि त्याच भांड फुटलं आहे.

ही घटना जळगावमधील काव्यरत्नवाली चौकात घडली होती. घटनास्थळाच्या जवळील एचडीएफसी बँकेत धनराज पुरोहित यांचे खाते आहे. त्यांनी त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपयांची रोकड काढली आणि घरी जायला निघाले होते. त्याचवेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेला राहुल चौधरी मोटारसायकल वरून आला आणि पुरोहित यांच्या हातातून बॅग पळवण्याचा प्रयत्न करत होता. राहूलने पुरोहितांच्या हाताला जोरात हिसका मारला मात्र, त्यांनी शेवट पर्यंत बॅग आपल्या हातात पकडून ठेवल्याने राहुल चौधरी झटापटीत गाडी वरून खाली पडला. आणि तिथल्या लोकांनी त्याला बेशुद्ध होईपर्यंत झो़डपलं.

दरम्यान, राहुल शुद्धीवर आल्यावर त्याची तपासणी करण्यात आली. त्याच्या खिशात बीएसएफ कर्मचारी असल्याच बनावट ओळखपत्र पोलिसांना मिळालं. बेरोजगार असल्याने चोरीचा प्रयत्न केल्याचं राहुलने पोलिसांना कबूल केलं. पतीचा अपघात झाल्याची माहिती कोणीतरी राहुलच्या पत्नीला दिली. त्या धावपळ करत दवाखान्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना राहूलच्या चोरीबद्दल सांगितलं. या अगोदर देखील राहुल चौधरी ने काही गुन्हे केले आहेत का त्याचा तपास आता रामानंद नगर पोलीस करीत आहेत.

थोडक्यात बातम्या

…म्हणून ‘या’ वकिलानं स्वत:च्या रक्तानं लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, पाहा व्हिडीओ

आज हिंदू समाज थकलाय, ज्या दिवशी तो जागा होईल त्यावेळी…- मोहन भागवत

राजेश टोपेंची जनतेला कळकळीची विनंती; म्हणाले…

‘भारतासाठी खेळायचं त्याचं स्वप्न आता पूर्ण होईल’; इशानच्या आईवडिलांना अश्रु अनावर

कॅनरा बॅंकेचं स्तुत्य पाऊल, हाऊसिंग तसेच एज्युकेशनल लोनला गती देण्यासाठी उपक्रम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या