बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! पुरुषांपेक्षा जास्त ‘या’ स्त्रियांना पाॅर्न पाहण्यात अधिक रस, अभ्यासातून झाला ‘हा’ खुलासा

नवी दिल्ली | तरुण पिढीमध्ये पाॅर्न व्हिडीओ पाहण्याचे प्रमाण जास्त असते, असा प्रत्येकाचा समज आहे. मात्र नुकताच झालेल्या एका अभ्यासातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. तरुण मुलं, मुली, तसेच पुरुष यांच्यापेक्षाही अश्लील व्हिडीओ पाहण्यात विवाहीत स्त्रियांना जास्त रस असतो, असं समोर आलं आहे.

युरोपियन फेडरेशन ऑफ सेक्सोलाॅजी यांनी केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. यादरम्यान एक सर्व्हे घेण्यात आला होता. यावेळी युरोपमधील काही जोडप्यांशी चर्चा करण्यात आली होती. चर्चेमध्ये जोडप्यांना सेक्स लाईफ, पाॅर्न पाहणं, अशाबाबतचे प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्व्हेमधील 9 टक्के महिलांनी लग्नाआधी पाॅर्न पाहत असल्याचं सांगितलं तर 28 टक्के महिलांनी लग्नानंतर पाॅर्न पाहत असल्याचं सांगितलं आहे.

घेण्यात आलेल्या सर्व्हेमधून पुरुषांबाबत उलट माहिती समोर आली आहे. लग्नाआधी 23 टक्के तर लग्नानंतर 14 टक्के पुरुष पाॅर्न पाहतात. स्त्रिया घरातील कामांच्या तणावामुळे पाॅर्न पाहत असल्याचं म्हणतात. तर पुरुष लग्नानंतर इतर गोष्टी, काम, पैसे, यामध्ये गुंतून जातो. परिणामी त्याला आपल्या पत्नीला वेळ देता येत नाही. याचकारणामुळे स्त्रिया पाॅर्न पाहतात.

दरम्यान, 6.1 टक्के स्त्रिया सेक्स लाईफ फँटसीच्या इच्छेमुळे देखील पाॅर्न पाहतात. शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पाॅर्न व्हिडीओ बनवत असल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. यानंतर पाॅर्न व्हिडीओबाबत अधिक खुलासे होत आहेत. काही दिवसांपुर्वी करण्यात आलेल्या अभ्यासातून पुणे हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पाॅर्न पाहणारा जिल्हा असल्याचं समोर आलं होतं.

थोडक्यात बातम्या-

यो यो हनी सिंगच्या अडचणीत वाढ; पत्नीनं दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार

नीरज चोप्राची धडाकेबाज कामगिरी; भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये एन्ट्री

कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ; लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संक्रमण

वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण…- प्रविण दरेकर

‘माझ्या अंगावरून गाडी घाला’; पुण्यात भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More