Top News महाराष्ट्र मुंबई

‘नायक’ सिनेमाप्रमाणे ही तरूणी ‘या’ राज्याची या दिवशी होणार एक दिवसाची मुख्यमंत्री

मुंबई | ‘नायक’ सिनेमा सर्वांनाच माहित असेल त्यामध्ये एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून अभिनेता अनिल कपूर चित्रपटात काम करतो. त्या दिवशी तो अनेक धडक कारवाया करतो आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करतो. हे झालं चित्रपटात मात्र उत्तराखंड राज्यात एका मुलीला एक दिवसासाठी मुख्यमंत्री होता येणार आहे.

सृष्टी गोस्वामी असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. हरिद्वारच्या बहादूराबाद ब्लॉकच्या दौलतपूरची रहिवासी आहे. तिने काही चॅलेंज वगरे नाही दिलं चित्रपटातील कथेप्रमाणे, तिला एक दिवस मुख्यमंत्री देण्याचं कारण असं आहे की, 24 जानेवारी रोजी बालिका दिवस आहे.

ज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी हुशार विद्यार्थीनीला एक दिवसाची मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सृष्टीला एक दिवसाची मुख्यमंत्री करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनीही मंजुरी दिली आहे.

दरम्यान, राज्याला एक मुख्यमंत्री असताना एक दिवसासाठी राज्याची मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यासोबतच सृष्टी विधानसभेलादेखील संबोधित करणार आहे.

थोडक्यात बातम्या-

अरे काय चाललंय काय?, महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?- चंद्रकांत पाटील

“विरोधी पक्षाने मुद्दा उचलल्याने मला वाटलं की मी मोठ्या राजकीय षडयंत्राचा बळी होत आहे”

सीरमला लागलेल्या आगीत एक हजार कोटींचं नुकसान झालं- आदर पुनावाला

‘…तर काँग्रेस पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

सीरमच्या आगीमागे घातपात होता की अपघात हे चौकशीनंतर कळेल- उद्धव ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या