Top News जालना महाराष्ट्र

“मुंबईच्या ‘या’ रुग्णालयात केला जाणार कोरोना लसीकरणाचा पहिला प्रयोग”

जालना | कोरोना साथीच्या रोगाचा कायमचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील सर्व नागरीक कोरोनावरील लसीची प्रतीक्षा करतं आहेत. यातच मुंबईतील केईएम रुग्णालयात राज्यातील लसीकरणाचा पहिला प्रयोग केला जाणार असल्याची महत्वाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील लसीकरणाची पूर्ण तयारी झाली असून, आता फक्त केंद्र ,सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची वाट पाहत असल्याचं राजेश टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलतं असताना सांगितलं.

वाहतूक आणि कोल्ड चेनची व्यवस्था प्रत्येक राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने करण्याची गरज आहे. अत्यंत जलद गतीने महाराष्ट्रात ते काम सुरु आहे. तसेच महाराष्ट्रात कोल्ड चेन, प्रशिक्षण आणि वाहतुकीबद्दल जे टार्गेट अदर पूनावाला यांनीदेखील दिले होते ते आम्ही पूर्ण केलं असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हणाले.

दरम्यान, कोरोनावरीस लस देताना कोणाला पहिले प्राधान्य दिले जाणार, तसेच लसीकरण कशा पद्धतीने केले जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक तरी माहित आहे का?’; मुख्यमंत्र्यांची टीका

कोथरुडच्या सोसायटीत शिरला गवा; गवगवा झाल्यावर पुणेकरांची तोबा गर्दी!

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या

“…फुसकुली सोडून भाजपने स्वतःचीच अक्कल दिवाळखोरी जाहीर केली”

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई; रिया-सुशांत प्रकरणाशी संबधीत ड्रग पेडलरला अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या