पुणे | आजचा हिंदू समाज सगळा सडलेला आहे. हिंदू समाद हत्या करतो. घरी जाऊन अंघोळ करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो, असं अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी यानी वक्तव्य केलं.
30 जानेवारी रोजी पुण्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शरजील उस्मानी बोलत होता. त्यानी केलेल्या वक्तव्यामुळं राज्यात चांगलचं वातावरण तापलं आहे.
परिषदेत उस्मानीनं केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसंच ‘मी संघराज्या मानत नाही’ असंही त्यानी म्हटलं आहे.
दरम्यान, उस्मानीन केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली जातं आहे.
थोडक्यात बातम्या-
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ‘या’ मराठी दिग्दर्शकाला एनसीबीनं घेतलं ताब्यात
‘ट्रॅक्टर आणि जेसीबी…’; संजय राऊत-राकेश टिकैत भेटीवर कुणाल कामरा म्हणाला…
“शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं”
धनंजय मुंडेंचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत; क्रेनद्वारे घातला फुलांचा हार