Top News कोरोना पुणे महाराष्ट्र

चिंताजनक! पिंपरी- चिंचवड शहरात पुन्हा वाढला कोरोनाचा आकडा

पुणे | पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाचला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. शहरात नवीन 1331 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे.

पिंपरी- चिंचवड शहरात कोरोना बाधितांच्या संख्येचा आकडा एकूण 61231 इतका झाला आहे. शहरातील 1265 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून, शहराबाहेरील 66 रुग्णांना करोनाची लागण झाली आहे.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या तर वाढतचं आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यूचेही प्रमाण वाढू लागलं आहे. तब्बल 41 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पालिकेनूसार गेल्या चोवीस तासात 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित रुग्ण जुने आहेत. त्यामधी शहरातील 28 आणि शहराबाहेरील 13 रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोन लाखांच्या वर गेला आहे. दिवसेंदिवस पुण्यातील कोरोनाची परिस्थीती गंभीर होत चालली आहे. ही परिस्थीती आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये नाहीतर…”

“…हा तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा अवमान”

मोठा निर्णय; पुण्याजवळील ‘हा’ भाग आजपासून 7 दिवस बंद राहणार

दारुबंदीसाठी शिरुर तालुक्यात वापरणार ‘आण्णापूर पॅटर्न’

लेखिका शोभा डे यांची शिवसेनेवर बोचरी टीका, म्हणाल्या…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या