बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भान राखून वक्तव्य केलं असतं तर…’; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राणेंना टोला

पुणे | केंद्रीय मंत्री भाजप नेते नारायण राणे यांच्या खात्यातून महाराष्ट्रासाठी किती निधी मिळणार?, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आला. यावर बोलताना अजित पवारांनी नारायण राणेंना टोला हाणला आहे.

सूक्ष्म आणि लहानमध्ये काय मिळणार आहे?, निधी द्यायचा झाला तर केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी देऊ शकतात. गडकरींनी याआधीही निधी दिला आहे आणि कामं पण चालली आहेत. या खात्याचं पूर्वी नाव अवजड खातं होतं. काही लोकं त्याला गंमतीने अवघड खातंही म्हणायचे मात्र आता त्याच्या नावात काही बदल झाला आहे, असं अजित पवार म्हणाले. त्यासोबतच पवारांनी राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही भाष्य केलं.

प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात चौघांना स्थान दिलं आणि त्यानंतर त्यांना सांगितंल फिरा त्यामुळे त्यांना आता फिरणं भाग आहे. मात्र बोलताना जर प्रत्येकाने भान राखून वक्तव्य केलं तर असे प्रसंग घडणार नाहीत, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, अजित पवार आज कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी  कोरोनाच्या नियमावली संदर्भात काही सूचनाही दिल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

थोडक्यात बातम्या- 

“आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ”

हळू रे हळू! गेलने सिक्स मारत फोडली गॅलरीची काच, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!

राज्यातील आणखी ‘एका’ जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश

पॅराऑलिम्पिकमध्ये भाविनाची ऐतिहासिक कामगिरी; भारताचं पदक निश्चित

‘…तर मला मान्य असेल’; सेना-भाजप युतीबाबत नारायण राणेंचं मोठं वक्तव्य!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More