बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाग्रस्तांना बेडसाठी भरत जाधवची आयडियाची कल्पना, “हीच ती वेळ आपले कर्तव्य बजावण्याची”

मुंबई | कोरोनाबाधितांच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या आकड्यामुळे राज्यात नवीन कोरोनाग्रस्तांना बेड उपलब्ध होत नाय्येत. प्रशासन आपले प्रयत्न करत आहे त्यासोबतच काही सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते पुढाकार घेत काही नवीन संकल्पना राबवत आहेत. जेणेकरून कोरोनाला हरवण्यासाठी खारूताईचा वाटा उचलत आहेत. अशातच प्रसिद्ध मराठी अभिनेता भरत जाधनेही अशाच प्रकारे एक पोस्ट करत कोरोनाबाधितांसाठी बेडच्या उपलब्धतेसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट वाचली, ती संकल्पना आवडली म्हणून शेअर करत आहे. एका अपार्टमेंट सोसायटीमधील हा प्रयोग, यावर सर्वांनी विचार करण्यासारखे आहे…माझ्या सोसायटी मध्ये 4 जण पॉझिटिव्ह होते. बेड मिळत नव्हते, त्यात प्रत्येकांचे फ्लॅट वन बीएचके, त्यांच्या घरी वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटी मधील २ रिकामे फ्लॅट ताब्यात घेतले आणि तेथे पॉझिटिव्ह रुग्ण शिफ्ट केले. दार उघडून जो तो जेवण, नाष्टा औषधे देत होता, रिकाम्या फ्लॅट धारकांचा 6 महिन्याचा मेंटेनन्स माफ केला, त्यामुळे त्यांनी सहकार्य केलं, अशी पोस्ट भरत जाधव यांनी केली आहे.

15 दिवसांनी सर्व जण बरे झाले. आता तेच फ्लॅट इमरजेंसीसाठी राखून ठेवले आहेत. हा छोटासा माझा प्रयत्न. आपल्या सर्वांचीच ही वेळ संकटातली आहे, अशा वेळी रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे यांचा समाजासाठी उपयोग व्हावा. हीच वेळ आहे पुढे होऊंन आपले कर्तव्य करण्याची, असं आवाहनदेखील भरत जाधवने पोस्टमध्ये केलं आहे.

दरम्यान, भरत जाधव यांनी शेअर केेलेल्या पोस्टला सकारात्मक प्रतिसाद येत आहेत. अत्यावश्यक बेडची गरज असेल तर हा उपक्रम फायद्याचा ठरणारा आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

 

थोडक्यात बातम्या- 

संजय राऊत यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

‘आमचं प्राधान्य अमेरिकन नागरिकांना’; लसीसाठी लागणारा कच्चा माल न देण्यावर अमेरिका ठाम

मोदी आणि शहा दोघेही विनामास्क फिरतात, त्यांनी कोणते इंजेक्शन घेतलं?- नाना पटोले

सुजय विखेंचा गनिमी कावा, स्पेशल विमानानं दिल्लीहून 10 हजार रेमडेसिवीर आणली!

‘आजारातून बरा झाल्यावर एक झाड लाव’; सोशल मीडियावर डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तुफान व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More