बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवस लॉकडाउन वाढवला

नाशिक | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 मे पर्यंत कडक संचारबंदीचे आदेश राज्यभरात लागू केले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने कडक लॉकडाउनची तसेच काही ठिकाणी जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे.

नव्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे आता जिल्हास्तरावर कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्याकडे कल वाढला असून, नाशिक शहरातही लॉकडाउन लावला जाणार आहे. 12 मेपासून हा निर्णय लागू केला जाणार आहे. 12 मेपासून शहरात कडक लॉकडाउन केला जाणार आहे. दहा दिवसांसाठी लॉकडाउन असणार आहे. 12 मे रोजी दुपारी 12 वाजता कडक लॉकडाउनची सुरूवात होईल. त्यानंतर 22 मे रोजी दुपारी 12 वाजता लॉकडाउनची मुदत संपणार असल्याचं अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

सर्व सेवा आणि दुकानं बंद राहणार असून, फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल सुरू राहणार आहेत. या काळात कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही, असंही जाधव यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णवाढीला ब्रेक लागला असला, तरी त्यामध्ये घट झालेली नाही. तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही करोनाचा संर्सग पोहोचल्यानं चिंता वाढली आहे. त्यामुळे आता जिल्हा स्तरावर कडक लॉकडाउनचा उपाय निवडला जात आहे. नाशिक शहरातील परिस्थितीही चिंता वाढवणारी असल्याचं  कैलास जाधव म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल’; एकतर्फी प्रेमातून युवकाची तरूणीकडे शरीरसुखाची मागणी

‘आजी वारल्याचं का सांगितलं नाही?’; तरुणाला दोघा आत्तेभावांकडून जबर मारहाण

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमधील या खेळाडूच्या वडिलांचं कोरोनाने निधन 

“सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागते, मग केंद्र सरकार काय करतंय?”

“संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही अन् ‘सामना’ही वाचत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More