Top News पुणे महाराष्ट्र

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून होणार दंड वसूल- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे | पुण्यात कोरोनाचा फैलाव वेगाने पसरतं असल्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाचली आहे. हे लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या आणि धुम्रपान करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करा, अशा सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

तंबाखूचे आरोग्यावर होणारे परिणान लक्षात घेऊन, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळणे गरजेचं असून नागरीकांच्या चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असं डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितलं. गुरुवार 10 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समीतीची बैठक पार पडली.

या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर, जिल्हा समन्वयक डॉ. सुहासिनी घाणेकर, जिल्हा सल्लागार डॉ. राहूल मणीयार यांच्यासह स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनीधीही या बैठकीत उपस्थित होते.

दरम्यान,  शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोर आदर्शस्थानी असल्यामुळे शिक्षकांनीही तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करु नये. त्यासाठी शाळा विभाग आणि जिल्हा परिषदेने ‘तंबाखू मुक्त शाळा अभियान’चे नियोजन करावं, असंही डॉ. राजेश देशमुख यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

क्वीन कंगणा एका दिवसाच्या शूटिंगसाठी घेते 1.5 कोटी तर पुर्ण चित्रपटासाठी…..

“कंगणाचं ऑफिस अनधिकृत? असेलही… पण ते पूर्ण होईपर्यंत का थांबले होते सगळे?”

‘त्या पार्टीत आदित्य ठाकरेही उपस्थित होते’; ‘या’ अभिनेत्रीने केला मोठा खुलासा!

अत्यावश्यक सेवेचा बोर्ड लावलेला टेम्पो; पोलिसांनी पकडल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

उद्धव ठाकरेंविरोधात अरेतुरेची भाषा सहन करणार नाही- इम्तियाज जलील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या