देश

पैशांचा तुटवडा असल्याने राहुल गांधींनी घेतली 1,000 रुग्णांची जबाबदारी

नवी दिल्ली |  देशभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना संसर्ग रोखण्याच्या कामी गुंतली आहे. अशातच किडनी आणि लिव्हरसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांची समस्या वाढली आहे. लॉकडाऊन असल्यामुळे या आजाराने त्रस्त असलेले रूग्ण पैशांचा तुटवडा या कात्रीत अडकले आहेत. हाच मुद्द लक्षात घेऊन काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आपला मतदारसंघ वायनाडमधील 1,000 रुग्णांच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी उचलली आहे.

राहुल गांधी यांनी मंगळवारी 28 एप्रिललाआपला लोकसभा मतदारसंघ वायनाडमधील नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यात मतदारसंघातील अनेक किडनी आणि लिव्हर रुग्णांना लॉकडाऊनमुळे उपचार घेणं शक्य होत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला.

राहुल गांधी यांनी तात्काळ अशा 1 हजार रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घेतली. किडनी आणि लिव्हरचे उपचार बरेच महागडे असतात. त्यात लॉकडाऊनमुळे हातात असलेलं कामही गमावलेल्या नागरिकांना असा खर्चिक उपचार घेणं अशक्य होत आहे.

दरम्याम, वायनाडच्या स्थानिक नेत्यांनी परदेशात अडकून पडलेल्या नागरिकांना आपल्या घरी आणण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करावी अशी राहुल गांधींना विनंती केली.

ट्रेंडिंग बातम्या-

‘ते 25 लाख परत द्या’; कोरोनासाठी दिलेली मदत भाजप आमदाराने परत मागितली

ही लढाई कोरोनाविरुद्धची नव्हे तर निसर्गा विरोधातील- मोहन आगाशे

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनाविरुद्ध लढाईत फडणवीस रस्त्यावर दिसण्याऐवजी राजभवनातच जास्त दिसतात”

धक्कादायक! पुण्यात आज सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चिंताजनक

कोटामध्ये अडकलेले 60 विद्यार्थी बीडमध्ये परतले; कुटुंबियांना मोठा दिलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या