बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्या शाखाध्यक्षाच्या घरी स्वत: जेवायला जाणार’; राज ठाकरेंची अनोखी ऑफर

पुणे | पुण्यातील येत्या निवडणकीच्या पार्श्वभूमीर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे शहरातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. त्यासोबतच त्यांना जोमाने काम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना त्यांना त्यांच्या मनातील हवी हवीशी इच्छा पुर्ण करून घेण्याची संधी ठाकरेंनी उपलब्ध करून दिली आहे.

प्रभाग अध्यक्ष ही नेमणूक रद्द करून शाखा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नेमणूक केली जाणार आहे. जो शाखा अध्यक्ष चांगल काम करेल त्याच्या घरी आपण जेवण करण्यास जाणार असल्याचं राज ठाकरे यांनी आज पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी मार्गदर्शन करताना म्हटलं आहे.

सेनापती बापट रोडवरील इंद्रप्रस्थ हॉल येथे झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. राज ठाकरेंच्या अनोख्या संकल्पनेमुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी सर्वांना काम करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली. त्यामुळे आता राज ठाकरेंना घरी जेवण करायला घेऊन जाण्याचा मान कोणत्या पदाधिकाऱ्याला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

जनतेच्या सेवेत समर्पित, म्हणत राज्यमंत्री झाल्यावर भारती पवार संसदेत जाताना नतमस्तक

मनसे कात टाकतेय; पुण्यातून महत्त्वाची माहिती समोर

मुंबई-पुणेकरांना पाऊस झोडणार, ‘या’ 9 जिल्ह्यांनाही रेड अलर्ट!

“CM फंडसाठी निधी द्या, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी गर्दी नको”

“ज्यांनी यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला, हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करताहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More