Top News जळगाव महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा; रोहित पवारांनी अर्ध्यावर सोडला कार्यक्रम

जळगाव | कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार नेहमी कुठेना कुठे उद्घाटनास जात असतात. अशातच रोहित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र जळगावातील पक्षाच्या जिल्हा कार्यालयालात भेटीदरम्यान  कार्यकर्त्यांच्या धिंगाण्यामुळे पवारांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

कार्यक्रमाचं नियोजन फसलं असल्याचं लक्षात आल्यावर रोहित पवारांनी माइकचा ताबा आपल्याकडे घेत आपल्या भाषणाला सुरूवात केली. पवारांनी अवघ्या पाच मिनिटात आपलं भाषण संपवलं.

ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यभर युवा वर्गाच्या हाती सत्तेची सूत्रं गेली आहेत. यापुढे आपण सर्व जण एकत्र आलो, तर पुढील निवडणुकांमध्ये निश्चितच चित्र बदललं असल्याचं रोहित पवार म्हणले.

दरम्यान, कार्यकर्त्यांची रेटारेटी, घोषणाबाजी आणि बेशिस्त वर्तन पाहून त्यांनी डोक्याला हात मारुन घेतला. भाषण संपल्यावर रोहित पवार आपल्या कार्यकर्त्यांना चुकवत मागच्या दाराने बाहेर पडले.  रोहित पवारांच्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा झाली.

थोडक्यात बातम्या-

‘कोरोनाच्या नियमांचं पालन होत नाही जर कोरोना वाढला तर…’; शरद पवारांनी व्यक्त केली ‘ही’ भीती

मास्क है जरुरी!; आदित्य ठाकरेंनी ‘मास्क’ म्हणताच सेना आमदाराची उडाली त्रेधातिरपीट!

‘तुमच्या शक्तीचा उपयोग करुन मुलाचं मन वळवा’; शेतकऱ्याचं मोदींच्या आईला पत्र

“तमिळनाडूचं भविष्य इथले युवा ठरवतील, त्यांच्या मदतीला आता मी आलो आहे”

ममता बॅनर्जींचा वीक पॉइंट भाजपने ओळखलाय, दीदींनी चिडायला नव्हतं पाहिजे- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या