Top News महाराष्ट्र मुंबई

“मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?”

मुंबई | शेतकरी आंदोलनातील शेतकरी हे दहशतवादी असल्याचं अभिनेत्री कंगणा राणावत म्हटलं होतं. शेतकऱ्यांनी देशात चक्का जामची हाक दिली आहे. अशातच काँग्रेसने कंगणावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वतोपरी आहे. त्याला खलिस्तानी, नक्षलवादी आणि देशद्रोही म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली, असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच त्यांनी कंगणाने महाराष्ट्राचा केलेल्या अपमानाची आठवण करून दिली आहे.

मुंबई पोलीसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का? असा सवालही सावंत यांनी भाजपला केला आहे.

दरम्यान, प्रजासत्ताकदिनादिवशी दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्र्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या गोंधळावरून भाजप नेत्यांनी शेतकरी आंदोलकांना खलिस्तानी म्हटलं होतं.

 

थोडक्यात बातम्या-

मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा- रतन टाटा

“राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर पुन्हा वाशी टोलनाका फोडू”

‘फासा आम्हीच पलटणार’ देेवेंद्र फडणवींसाच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

‘सचिन तेंडुलकर भारतरत्नसाठी पात्र नाही त्याऐवजी…’; या माजी खासदाराने केली सचिनवर टीका

‘ज्यांना कोणाला पक्षात यायचं असेल त्यांना दारं खुली पण…’; राज ठाकरेंची खुली ऑफर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या