Top News महाराष्ट्र मुंबई

“ज्यांच्याबरोबर लढायचं त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची”

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण केलेलं दिसत आहे. भाजपने, तृणमुल काँग्रेसचे अनेक आमदार फोडले असून मंत्रिमंडळातील नेत्यांनीही राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.

2014 साली महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक तालुका, जिह्यात याच पद्धतीने फोडून भाजपने त्यांना उमेदवाऱया दिल्या. त्यातले बरेच लोक निवडून आले. अशा तऱ्हेने भाजपने आपला आकडा फुगवला. जे महाराष्ट्रात घडले, तेच प. बंगालात घडताना दिसत असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपची सूज त्याच पद्धतीची आहे. बिहारलाही तेच झाले. आता प. बंगालातही तृणमूल फोडून तृणमूलवर विजय मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बॉयफ्रेंडसाठी सख्ख्या मैत्रिणीची केली हत्या; हत्येचं कारण ऐकून पोलीसही हादरले

“रोहित पवारांचा नकलीपणा बघायचा असेल तर हे नक्की वाचा

महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; शिवसेना नेत्यानं शरद पवारांच्या विरोधात दंड थोपटले

“पुरंदरमधील विमानतळ बारामतीला पळवण्याचा शरद पवारांचा डाव”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या