लखनऊ | प्रेयसीचे दुसऱ्या तरुणासोबत लग्न झाल्याने संभल जिल्ह्यातील एका तरुणाने तिच्या पतीला तिचा अश्लील व्हिडीओ पाठवला. हा व्हिडीओ पाहून नवऱ्याने दहा दिवसांपूर्वी लग्न करून आणलेल्या नवविवाहितेला घराबाहेर काढलं. नवविवाहितेने जवळील पोलीस ठाण्यात आरोपी प्रियकरावर अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करून लैगिंक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.
ही घटना संभल जिल्ह्यातील बनिया ठेर गावात घडली होती. संबधित प्रियकर आरोपीच नाव शरीफ असून तो संभल जिल्ह्यातील नखासामध्ये राहतो.
अटक केलेल्या आरोपीचं पीडितेच्या घरी येणं जाणं असायचं या दरम्याने त्याने पीडितेसोबत संबंध बनवून अश्लील व्हिडीओ बनवला असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक आलोक जयस्वाल यांनी सांगितलं.
आरोपी तरुणाने लग्न झालेल्या प्रेयसीला जबरदस्ती शरीरसंबंध ठेवण्याची मागणी कली होती. पण तिने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने तो तिला व्हिडीओ व्हायरल करायच्या धमक्या देऊ लागला. नकार दिल्याने त्याने तिच्या पतीच्या मोबाईलवर व्हिडीओ पाठवला. हा व्हिडीओ पाहून त्याने बायकोला बेघर केलं.
थोडक्यात बातम्या –
चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ अजब वक्तव्याचा नवाब मलिकांकडून समाचार, म्हणाले…
पूजा राठोड प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती, चुलत भावाला वनखात्यात चिटकवलं?
‘या’ भाजप नेत्याची एसआयटी चौकशी करा; सुप्रिया सुळे यांची मागणी
कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात नवी नियमावली लागू, जाणून घ्या नेमकी काय आहे
धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं नवं फोटोशूट; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस