बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता- अण्णा हजारे

नवी दिल्ली | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या सुद्धा मनात आत्महत्येचा विचार आल्याचं सांगितलं आहे. राम कॉलेज ऑफ कॉमर्सतर्फे टेडएक्स या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अण्णा हजारेंनी बोलताना याबाबत भाष्य केलं.

तरूण वयात तरूणांच्या मनात अनेक प्रकारचे विचार येत असतात. मी तरूण असताना माझ्या मनातसुद्धा खूप विचार यायचे. मी 25 वर्षाचा असताना माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता. माझ्या मनात आलं की, काय आहे जीवनात?, कशासाठी आपण जगतोय?, त्यावेळी माझं जगणं मला व्यर्थ वाटू लागलं असल्याचं अण्णा हजारे म्हणाले.

मी माझ्या कामानिमित्त दिल्लीला गेलो होतो त्यावेळी दिल्लीच्या एका स्टेशनवर एका स्टॉलवर मला स्वामी विवेकानंद यांचं पुस्तक दिसलं ते पुस्तक मी वाचलं आणि मला जीवनाचा अर्थ समजल्याचं अण्णा हजारेंनी सांगितलं.

दरम्यान,  कार्यक्रमावेळी बोलताना अण्णा हजारेंनी युवकांना धूम्रपान, तंबाखू आणि दारू या व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमाला अजीत बजाज, गीतकार जावेद अख्तर आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी युवकांना मार्गदर्शन केलं.

थोडक्यात बातम्या- 

नाना पटोलेंच्या ‘त्या’ खळबळजनक पत्राबद्दल नितीन राऊतांचा मोठा खुलासा!

देशांतर्गत सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4 लाखापार,वाचा आकडेवारी

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक

कौतुकास्पद! नवविवाहीत जोडप्याने आहेराच्या पैशातून केलं गरिबांना धान्य वाटप

“यापुढे त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More