बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तिला विठ्ठल माफ करणार नाही”

मुंबई | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये होणाऱ्या विठुरायाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री रवाना झाले आहेत. पाऊस असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गाडीने पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे पंढरपूरला निघाले असून ते स्वत: गाडी चालवत आहेत तर त्यांच्यासोबत रश्मी ठाकरेही आहेत. याचाच धागा पकडत भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे.

विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही कारण इतक्या सहज पणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही, असं म्हणत निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम?, असंही निलेश राणेंनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत आहेत. यावेळी त्यांन आपली मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे गेले आहेत. ही गाडी मंत्री आदित्य ठाकरे वापरत असतात.

 

थोडक्यात बातम्या- 

मुंबई-पुणेकरांना पाऊस झोडणार, ‘या’ 9 जिल्ह्यांनाही रेड अलर्ट!

“CM फंडसाठी निधी द्या, वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी गर्दी नको”

“ज्यांनी यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला, हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करताहेत”

एकनाथ खडसे यांना ईडीचा दणका; अटकेत असलेल्या जावयाबाबत ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

येत्या निवडणूकीमध्ये एखादा उमेदवार निवडून नाही आला तरी चालेल, पण…, – देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More