Top News पुणे महाराष्ट्र

प्रबोधनकारांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही- उर्मिला मातोंडकर

पुणे | प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांचा वसा बाळगत तरुणाईला पुरोगामी महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल अविरत सुरू ठेवावी लागेल, असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवावेळी मातोंडकर बोलत होत्या.

प्रबोधनकारांशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. आयुष्य कधीतरी सुवर्णसंधी देते तर कधी निराशेच्या गर्तेत फेकते. यातून बाहेर कसे पडायचे, हे ‘माझी जीवनगाथा’ शिकवत असल्याचं मातोंडकर म्हणाल्या.

दरम्यान, वैचारिक गुलामगिरी अजूनही पूर्णत: संपलेली नाही. प्रबोधन या शब्दाचा अर्थ आज दुर्देवाने चुकीच्या अर्थाने वापरला जातो. मानसिक उदबोधन म्हणजे प्रबोधन. यातून होणारी क्रांती असत्यावर, अन्यायावर घाव घालणारी असल्याचं मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“राजकीय हवा बदलली आहे, भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात”

अजिंक्यच्या नावाचा मराठी चित्रपटसृष्टीशी आहे हा जुना संबंध; मधुकर रहाणेंनी सांगितली नावामागची खास बात!

दिग्दर्शक अभिषेक कपूर सुशांतचे ‘हे’ स्वप्न पूर्ण करणार

होते शरद पवार म्हणून मुंबईत लँड झालं टीम इंडियाचं विमान, अन्यथा…

दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मुख्यमंत्री घेणार लस!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या