बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांना दीड लाखाची सूट, राज्याचं इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर

मुंबई | पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे वाहन चालवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. इंधनांवरील वाहनांना एक उत्तम पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिलं जातं. याच इलेक्ट्रिक गाड्यांचा राज्यांतर्गत वापर वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मान्यता दिली आहे.

इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यास दीड लाखांपर्यंतची तर ई स्कूटर आणि बाईकच्या खरेदीवर दहा हजारापर्यंतची सूट मिळणार आहे. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने याबाबत आज घोषणा केली आहे. आजपासून 31 मार्च 2025 पर्यंत हे धोरण राबवण्यास मान्यता दिली आहे.

तसेच राज्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या चार्जिंग स्टेशनची देखील संख्या निश्चित करण्यात आली आहे. 3 किमी क्षेत्रात किमान एक चार्जिंग स्टेशन उभारण्यात येईल. तर महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रत्येक 25 किमीवर एक सार्वजनिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच ई-वाहन धोरणासंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत आदित्य ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहनासंदर्भात अनेक महत्वाचे मुद्दे मांडले होते.

थोडक्यात बातम्या –

“बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, आम्ही सर्वजण तुमच्यसोबत”

जीव लावून लढला पण फक्त एका चुकीमुळं महाराष्ट्राच्या प्रवीणचं मेडल हुकलं!

“महाराष्ट्राला शांत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापूजा करावी, 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती दूर होईल”

रायगड, रत्नागिरीसह नुकसानग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारची आर्थिक मदत; निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ वर्ग

मला पॉर्न कंटेंटच्या कामासाठी…; पॉर्नोग्राफी प्रकरणी सई ताम्हणकरचं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More