लंडन | सध्या जगभर लसीकरण मोहीम जोरदार सुरु आहे. अशात लशीचे काही साईड इफेक्ट समोर येत आहेत. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड अॅस्ट्राजेनेकाची लस घेतल्यानंतर 30 जणांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्या असून, त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत ब्रिटनच्या मेडिकल रेग्युलेटरने माहिती दिली आहे.
एस्ट्राझेन्का च्या लशीबाबत याआधीही युरोपातील काही देशांतून तक्रारी आल्या होत्या. त्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी जगभरातील देशांना अॅस्ट्राजेनेकाची लस वापरणे सुरु ठेवण्यासाठी शिफारस केली. मात्र, लसीबाबत अनेक देशांनी नागरिकांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर लसीच्या वापरावर स्थगिती आणली होती. त्यानंतर लसीच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले होते.
जागतिक आरोग्य संघटना, युरोपचे ड्रग रेग्युलेटर आणि अॅस्ट्राजेनेका यांनी ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले होते. या लसीच्या वापरामुळे रक्ताच्या गाठी किंवा मेंदूतील रक्तस्त्राव होण्याचा धोका असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. तसेच आरोग्य संघटनेने देखील अॅस्ट्राजेनेकाला क्लीन चिट देत सांगितले होते की, लस आणि रक्ताच्या गाठी याचा संबंध असलेली एकही केस आढळलेली नाही. मात्र, नागरिकांना त्रास जाणवू लागल्याने फ्रान्स, स्पेन, इटली आणि जर्मनीने अॅस्ट्राजेनेका लस वापरण्यास मनाई केली. या देशांनी असं म्हटले आहे की, लोकांनी लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी होत असल्याची तक्रार केली आहे.
दरम्यान, काही युरोपियन देशांनी या आधीच अॅस्ट्राजेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीद्वारे विकसित केलेल्या लसीच्या वापरावर काही प्रमाणात बंदी घातली होती. लसीकरणानंतर काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी होऊन झालेल्या संशयास्पद मृत्यूनंतर या देशांमध्ये लसीचा वापर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या –
राखी सावंत पुन्हा बांधणार लग्नगाठ, ‘या’ व्यक्तीसोबत लग्न करणार असल्याचं केलं जाहीर
भारताच्या हद्दीत चुकून घुसला पाकिस्तानी मुलगा, त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल!
‘तुमचं वजन वापरून बघा काय मिळतंय का?’; आव्हाडांचा फडणवीसांना टोला
बोंबला! बॉयफ्रेन्डची हत्या करून वडिलांसोबत केलं लग्न, प्लॅन करून तिघांनी केला त्याचा खात्मा!
स्वत:च्या लग्नाची पत्रिका देण्यास गेलेल्या नवरदेवाचा बाईक अपघातात मृत्यू!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.