बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाला हरवणारी देशातील सर्वात लहान कोरोना वॉरियर बनली ही चिमुकली, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | देशात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. अशातच आता कोरोनाची दुसरी लाट देखील आली आहे. यामध्ये अनेकांनी आपला जीव गमवला तर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या बरेच व्हिडीओ समोर आले आहेत ज्यामध्ये 100 वर्ष पार केलेल्या वृद्धांनी देखील कोरोनाला हरवलं आहे. अशातच आता एका 1 महिन्याच्या चिमुकलीने कोरोनावर मात केल्याची सकारात्मक बातमी समोर आली आहे.

संबंधित घटना हि ओडिशा मधील आहे. येथील एका चिमुकलीला दोन आठवड्यांपुर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर तिला भूवनेश्वरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर अनेक उपचार करण्यात आले. एवढंच नाही तर या नवजात बाळाला 10 दिवस व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आलं होत.

10 दिवस व्हेंटिलेटरवर राहून अखेर या बाळाने तिची कोरोनाची लढाई जिंकली. याबाबत बोलताना डाॅ. अरिजीत महापात्रा यांनी या चिमुकलिचे भरभरुन कौतुक केलं आहे. तसेच हा एक प्रकारचा चत्मकार असल्याचं देखील डाॅक्टर म्हणाले आहेत.

दरम्यान, डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ही मुलगी देशातील पहिलीच मुलगी जिने कोरोनावर इतक्या लहान वयात मात केली आहे. तसेच ती देशातील सर्वात लहान कोरोना वाॅरिअर असल्याचं देखील डाॅक्टर म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीस यांचं सोनिया गांधींना पत्र, म्हणाले ‘ये पब्लिक है ना’

ममता बॅनर्जी यांचे छोटे बंधू असीम बॅनर्जी यांचा कोरोनाने मृत्यू

‘माझ्या प्रश्नाचं किंबहुना उत्तर देणार का?’; गोपिचंद पडळकर यांचं उद्धव ठाकरेंना पत्र

UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ‘त्या’ 22 उमेदवारांना बार्टीमार्फत ऑनलाईन प्रशिक्षण!

गंगेच्या पात्रात 2 हजारपेक्षा जास्त मृतदेह, ‘या’ प्रख्यात वृत्तपत्राचा धक्कादायक दावा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More