बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डोक्यावरचं छप्पर उडालेल्या कोकणी बांधवांसाठी राज ठाकरेंकडून 1 हजार सोलापुरी चादरी!

मुंबई | राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कुठं दरड कोसळली, तर कुठं पूराचं पाणी थेट घरांमध्ये घुसलं. त्यामुळे अनेक लोक बेघर झालेत. या पूरग्रस्त कोकणवासीयांची सध्याची गरज ओळखून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 1 हजार सोलापूरी चादरी कोकणाला पाठवल्या आहेत.

सोलापूरातून 1 हजार चादरी कोकणला रवाना झाल्या आहेत. मनसे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्यावतीने या एक हजार सोलापुरी चादरींची मदत कोकणला देण्यात येत आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र पावसानं थैमान घातलं आहे. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवघड परिस्थितीत सर्व महाराष्ट्र सैनिकांना त्यांना जितकं जमेल तितकी मदत त्यांनी पूरग्रस्तांना करावी, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं.

आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही त्यात लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोहोचेल असं पहावं. काम करताना अर्थातच स्वत:ची काळजीही घ्यावी. महाराष्ट्रावरचं हे मोठं संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कुठलीही कुचराई होता कामा नये, असं राज ठाकरे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

आता करण जोहर करणार ‘बिग बाॅस 15’ चं सूत्रसंचालन!

पुरामुळे कोल्हापुरातील ‘हे’ महत्वाचे रस्ते बंद

पुन्हा कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने दाम्पत्याने उचललं धक्कादायक पाऊल!

सप्टेंबरपर्यंत लहान मुलांच्या लसीला मंजुरी मिळण्याची शक्यता – डाॅ. रणदीप गुलेरिया

राज कुंद्रा प्रकरणी क्राईम ब्रांचच्या तपासात धक्कादायक माहिती समोर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More