बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेजी, थोडा अभ्यास करत जा! चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंंत्र्यांना टोला

मुंबई |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन करण्याचा इशारा दिल्यानंतर लॉकडाऊन नको असा सूर उमटताना दिसत आहे. लॉकडाऊनच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला आहे. त्यासाठी आज पुण्यात भाजपने आंदोलन देखील केले. याचदरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेजी, थोडा अभ्यास करत जा!, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

पुण्यात लागू करण्यात आलेला मिनी लॉकडाउन आणि राज्यात लॉकडाऊनचे संकेत दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी एक ट्वीट करत टीका केली आहे. कोरोना नियंत्रणात संपूर्णपणे अपयशी ठरलेल्या ठाकरे सरकारने आपलं अपयश लपवण्यासाठी पुण्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊन लावला तर आपलं अपयश झाकता येईल, असं या लबाड सरकारला वाटतं. पण या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेचं काय होणार? याचा विचार आधी या सरकारने करायला हवा, असे पाटील यावेळी म्हणाले.

पहिल्या लॉकडाऊनमधून सावरत सावरत आता कुठे सर्वसामान्य जनतेचं जीवन रुळावर येत होते. परंतु आता या सरकारच्या मूर्खपणामुळे पुन्हा एकदा गोरगरीब जनतेची पिळवणूक होणार आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या या लबाड सरकारने पुन्हा लॉकडाऊन करताना जनता जुमानत नसल्याचं कारण देऊन यावेळी जनतेवरच आपल्या अपयशाचं खापर फोडलं आहे, असा आरोप  पाटील यांनी केला.

दरम्यान, ठाकरे सरकारने कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे आणि कोरोनाचे निर्बंध जसं की सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे इत्यादी नियम आणखी कडक करायला हवे होते. कारण हा लॉकडाऊन गोरगरीब जनतेला परवडण्यासारखा नाही. या सरकारला जर लॉकडाऊन लावायचाच असेल, तर त्यांनी आधी हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावावा. जगात जिथे जिथे पुन्हा कठोर लॉकडाऊन करण्यात आले, तिथल्या सरकारनं त्यांच्या जनतेच्या मदतीसाठी भरघोस पॅकेजदेखील आधी पोहचवले होते, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“…तर 30 एप्रिलपर्यंत कोरोनाची साखळी तोडणं शक्य आहे”

“माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत”

सचिन वाझे यांच्या प्रकृतीला धोका, वैद्यकीय तपासणीत ‘ही’ धक्कादायक बाब उघड

भारताच्या हद्दीत चुकून घुसला पाकिस्तानी मुलगा, त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल!

‘तुमचं वजन वापरून बघा काय मिळतंय का?’; आव्हाडांचा फडणवीसांना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More