‘आत एक, बाहेर एक’; असं उद्धव ठाकरे वागत नाहीत- मुख्यमंत्री

‘आत एक, बाहेर एक’; असं उद्धव ठाकरे वागत नाहीत- मुख्यमंत्री

मुंबई | आत एक आणि बाहेर एक असं उद्धव ठाकरे वागत नाहीत, असं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.

उद्धवजी अनेकदा भाषणं करतात. मी देखील भाषण करतो. टीका आणि आरोप होत असतात. मात्र ते माझ्यासमोर एक बोलले आणि माझ्या पाठीमागे दुसरंच काही बोलले, असं कधीही होत नाही, असं फडणवीसांनी सांगितलं. 

दरम्यान, उद्धवजी माझ्यासमोर माझ्याविषयी जे बोलतात, तेच माझ्या पाठीमागेही बोलतात. राजकारणात हे खूप कमी पाहायला मिळतं, अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-उद्धव ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक!

-गौरी लंकेश हत्या प्रकरणी आणखी एकाला अटक; कर्नाटक एटीएसची कारवाई

-…म्हणून भाजप नेत्याच्या भेटीला धनंजय मुंडे मध्यरात्री रुग्णालयात!

-त्यांना जनाची नाही, तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती!

-…तर सातारकर तुम्हाला माफ करणार नाही; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना इशारा

Google+ Linkedin