विराट कोहलीला मोठा धक्का; ‘या’ स्टार क्रिकेटपटूनं ऐन क्षणी घेतली माघार!
मुंबई | जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलचा 14वा हंगाम 9 एप्रिलपासून सुरु होईल,आता फ्क्त आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली आहे. 9 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेची फायनल 30 मे रोजी खेळवली जाईल. आयपीएलच्या या वेळापत्रकावर पुढच्या आठवड्यात शिक्कामोर्तब झाला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाआधी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला मोठा धक्का बसला आहे. आरसीबीचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिप आयपीएलमधून बाहेर झाला आहे. रॉयल चॅलेंजर्सने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिप याने वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जोश फिलिपच्या जागी आरसीबीने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिन एलनला संघात स्थान दिलं आहे.
जोश फिलीपीने आयपीएलच्या 13 व्या हंगामात आरसीबीकडून पदार्पण केलं होतं. सलामीला येत त्याने 5 सामन्यात 78 धावा केल्या होत्या. पण यंदाच्या आयपीएलमधून त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर, आयपीएल लिलावात 21 वर्षीय फिनवर कोणीही बोली लावली नव्हती. त्याची बेस प्राईस 20 लाख इतकी होती.
दरम्यान, जोश फिलिपने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याने फिन एलनला आरसीबीकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. फिनने अद्याप न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात पदार्पण केलेलं नाही, पण अलिकडेच संपलेल्या न्यूझीलंडमधील स्थानिक स्पर्धेत त्याने शानदार फॉर्म दाखवला आणि 11 सामन्यात 56.88 च्या सरासरीने व 193 च्या स्ट्राइक रेटने 512 धावा ठोकल्या होत्या.
Finn Allen replaces Josh Philippe for #IPL2021.
We regret to inform that Josh Philippe has made himself unavailable for IPL 2021 due to personal reasons. As a result, we have picked an exciting top order batsman in Finn Allen.#PlayBold #Classof2021 pic.twitter.com/DaasJ58ngk
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 10, 2021
थोडक्यात बातम्या –
अखेर माय-लेकीची भेट झाली… पाकिस्तानातून आलेल्या ‘त्या’ मुलीला साडेचार वर्षांनी कळलं खरं नाव
मंत्री बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यातच आत्महत्येचा प्रयत्न झाल्यानं मोठी खळबळ
बाईकवर स्टंट करताना दोघे आपटले, बघणाऱ्याच्या अंगावर येईल काटा; पाहा व्हिडीओ
कुख्यात गुंड गजा मारणेला पकडण्याचा थरार कॅमेऱ्यात कैद; पाहा CCTV फुटेज
पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांना मोठा धक्का; 2 कुख्यात टोळ्यांमधील ‘या’ 13 जणांवर मोक्का!
Comments are closed.