बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे!

मुंबई | मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना काल रात्री त्यांचा जामीन मंजूर झाला. त्यानंतर आता नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे-

  1. काही जण माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतात हे देखील मला माहिती आहे. पण त्याविषयी मी काही बोलणार नाही, अशी टीका नारायण राणे यांनी माध्यमांवर केली आहे. न्यायालयाचा दोन्ही निकाल माझ्या बाजूने लागला, असंही नारायण राणे यांनी म्हटलंय.
  2. राज्यात जाऊन जनतेचे आशीर्वाद घ्या, असं मोदींनी सांगितलं होतं. पुढचे दोन दिवस यात्रा होणार नाही. परवापासून पुन्हा यात्रा सुरू करणार असल्याचंही नारायण राणे यांनी सांगितलं आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी मला साथ दिली, असं म्हणत राणे यांनी त्यांनी भाजप नेत्यांचे आभार मानले आहेत.
  3. मी काय असो बोललो होतो? ज्याचा एवढा राग आला. मला राजकारणाला 52 वर्ष झाली. आतापर्यंत शिवसेनेने असे शब्द कधी उच्चारले नाहीत काय?, असा सवाल देखील नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
  4. मला माझ्या राष्ट्राचा अभिमान आहे, म्हणून मी ते वक्तव्य केलं, असं स्पष्टीकरण देखील नारायण राणे यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा योगी आदित्यनाथ यांच्यावर वक्तव्य केलं होतं ते बरोबर होतं का?, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.
  5. पवारसाहेब याला मुख्यमंत्री केला, याचा सुसंस्कृतपणा बघा, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याला मुख्यमंत्री केलं, हे तुमचं चुकलं असं मला वाटत नाही, असंही राणे यांनी शरद पवारांना म्हटलंय.
  6. तुम्ही कोणी माझं काय करू शकत नाही. तुम्हाला मी पुरूण उरलो आहे. माझ्यामुळे शिवसेना वाढली. ज्यांच्यावर मी बोललो ते देखील नंतर आले, असंही राणे म्हणाले आहेत.
  7. संजय राठोड यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठलाग करणार, असंही नारायण राणे म्हणाले आहेत. तर अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
  8. शिवसेनेने आजच्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावर राणेंना प्रश्न विचारण्यात आला. संजय राऊत संपादकाच्या लायकेच्या नाहीत, अशी घणाघाती टीका राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे.
  9. मी गॅगस्टर होतो तर मला मुख्यमंत्री कसं केलं, असा सवाल राणे यांनी पत्रकार परिषदेत विचारला आहे. आता जपून पावलं टाकलं पाहिजे, असंही सुचक वक्तव्य नारायण राणे यांनी केलंय.
  10. हे सरकार फक्त काही दिवसांपूरत राहिलंय, अशी टीका देखील राणे यांनी केली आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर टोमणे मारले आहेत. तर संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यानंतर आता शिवसेना राणेंच्या वक्तव्यावर काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

पवार साहेब याला मुख्यमंत्री केला, याचा सुसंस्कृतपणा बघा- नारायण राणे

‘…म्हणून मी ते वक्तव्य केलं’; वादग्रस्त वक्तव्यावर नारायण राणेंचं स्पष्टीकरण

संजय राऊतांची नवी फेसबुक पोस्ट, सोशल मीडियावर जोरदार राडा!

अनिल परबांवर गुन्हा दाखल करा, भाजपची रत्नागिरी पोलीस अधीक्षकांकडे मागणी!

नारायण राणेंच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More