बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या नाकात 1000 पटीनं अधिक व्हायरस, संशोधनातून नवी माहिती समोर

नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूचे नवनवीन व्हेरिएंट समोर येताना दिसत आहेत. यातच कोरोना विषाणूच्या डेल्टा पल्स व्हेरिएंटनं सध्या देशभरात एकच खळबळ माजली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट हे कोरोना विषाणूचं बदललेलं रूप आहे. हे रुप राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं कारण बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच आता चीनच्या संशोधनामधून नवी माहिती समोर येत आहे.

चीनचे गुआंगडोंग प्रोविंशियल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅड प्रिवेंशन डिपार्टमेंटचे संशोधक जिंग लू आणि सहकाऱ्यांनी 62 कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर संशोधन केलं आहे. या चीनच्या संशोधनातून कोरोनाच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचं समोर आलं आहे.

या व्हेरिएंटमुळे संसर्ग झालेली व्यक्ती अधिक व्हायरस बाहेर टाकत असल्याचंही या अभ्यासातून समोर आलं आहे. याव्यतिरिक्त सामान्य व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाकात 1000 पटीनं जास्त व्हायरस असतात. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हेरिएंट अधिक वेगानं फैलावत असल्यानं सगळीकडे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या या बदलत्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं. डेल्टा व्हेरिएंट हा घातक असून त्याच्याबद्दल इतर माहिती गोळा करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपण लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही स्वतःची काळजी घेत कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे.

 थोडक्यात बातम्या –

“संसदेतील गोंधळाचं खापर विरोधकांवर फोडून तुमच्या त्या लोकशाहीचं श्राद्धच घाला”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचं ‘नाचता येईना अंगण वाकडं’- प्रविण दरेकर

मोठी बातमी! पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या तारखेत पुन्हा बदल

बुमराह-शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांची शरणागती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More