बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यानंतर युक्रेनियन नौसैनिकांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

कीव | रशियाने (Russia) 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर (Ukraine) सैन्य कारवाईचे आदेश दिले आणि रशिया-युक्रेन युद्धाला (Russia-Ukraine War) सुरूवात झाली. हे युद्ध सुरू होऊन जवळपास 50 दिवसांचा कालावधी उलटला असला तरी रशियाकडून होणारे हल्ले अधिक तीव्र करण्यात आले आहेत.

रशियाकडून सातत्याने होणारे बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले यामुळे युक्रेनमधील शहरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील मारियुपोल (Mariupol) शहरातील हजारो नौसैनिकांनी मोठं पाऊल उचललं आहे.

मारियुपोल येथील 1000 पेक्षाही अधिक सैन्यांनी आत्मसमर्पण (Surrender) केलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन रिपब्लिक ऑफ चेचन्याचे नेते रमजान कादिरोव (Ramzan Kadyrov) यांनी टेलिग्रामवर याबाबतची माहिती दिली आहे.

दरम्यान, 1000हून अधिक नौसिकांनी आज मारियुपोलमध्ये आत्मसमर्पण केलं. यात शेकडो जखमी झाले आहेत. त्यांनी उचलेलं हे योग्य पाऊल असल्याचंही कादिरोव म्हणाले आहेत. तर रशियाकडून सातत्याने होणाऱ्या तीव्र हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भयावह होत चालली आहे.

थोडक्यात बातम्या-

पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात पावसासह गारपिटीची शक्यता

मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

“राजसाहेबांचं आजचं भाषण बाळासाहेबांची आठवण करून देणारं”

‘काळजी घे, दगदग करू नको’; पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट

“राज ठाकरेंचं भाषण म्हणजे एंटरटेनमेंट, सिनेमात असतं तसं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More