बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात 24 तासात 1008 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 11 हजार 500 च्याही वर

मुंबई | महाराष्ट्रात 24 तासात 1008 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही आता 11 हजार 506 इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज 106 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत 1879 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

24 तासांमध्ये झालेल्या 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूंपैकी 10 मृत्यू पुण्यात, 5 मुंबईत, 3 जळगावात, 1 पुणे जिल्ह्यात, 1 सिंधुदुर्गमध्ये, 1 नांदेडमध्ये, 1 भिवंडीत, 1 ठाण्यात, 1 औरंगाबाद आणि 1 मृत्यू परभणीत झाला आहे.

मृत्यू झालेल्या 26 रुग्णांमध्ये 18 पुरुष तर 8 महिला होत्या. यातले 14 जण हे 60 वर्षांच्या वरील वयाचे होते. यातले 11 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातले होते. 26 पैकी 15 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे गंभीर स्वरुपाचे आजार होते.

 

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज ठाकरेंनी खडसावलं, म्हणाले…

मोदी सरकारचा मोठा निर्णय; अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी

महत्वाच्या बातम्या-

पुण्यातून कुणाला जाता येणार गावी?; कसा कराल अर्ज??? जाणून घ्या सर्व माहिती

पुण्यातील पावसाचं रौद्ररुप दाखवणारे सहा व्हिडीओ

तळीरामांना मोठा दिलासा; दारुची दुकानं सुरू होणार पण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More