देश

कोरोनाचा परिणाम, परीक्षा न देता विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात!

नवी दिल्ली |  ऐन परीक्षेच्या तोंडावर भारतात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मुलांच्या परिक्षा वेळेत होणार की नाही? असे प्रश्न विद्यार्थांना आणि पालकांना सतावत आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने मुलांच्या परीक्षा न घेता त्यांना पुढच्या वर्गात जाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरस आणखी किती काळ राहू शकतो किंवा त्याचा धोका आणखी किती काळ आहे? हे आताच कळणं अशक्य आहे. त्यामुळे पुढील सत्र सुरू होण्यास विलंब होऊ नये म्हणून उत्तर प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पहिली ते आठवीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना थेट पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार आहे. म्हणजेच कोणतीही परीक्षा न विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करुन थेट पुढील वर्गात पाठविले जाणार आहे.

दरम्यान, २ एप्रिलपर्यंत उत्तर प्रदेशातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये खासगी शाळांचा देखील समावेश आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!

“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

“भीमा कोरेगावची दंगल सुनियोजित; शरद पवार आयोगासमोर साक्ष देतील”

परदेशातून परतलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात राहणं अनिवार्य करा- मुरलीधर मोहोळ

कोरोनाने उभी बाटली केली आडवी; 31 मार्चपर्यंत पुण्यातली दारूची दुकाने बंद!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या