बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळीज पिळवटून टाकणारी घटना; रुग्णालय मिळेना, चिमुकलीनं बापाच्या कुशीतच सोडला जीव !

लखनऊ | मुझफ्फरनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 11 महिन्यांच्या मुलीचा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मृत्यू झाला आहे. मुलीला कोणत्याच रुग्णालयात प्रवेश मिळाला नाही. अखेर वडीलांच्या कुशितच या चिमुरडीनं आपले प्राण सोडले आहेत.

सहारनपूरमधील रहिवासी असेलेले अशोक यांची 11 महिन्यांची मुलगी सोमवार रात्रीपासून आजारी होती. त्यांनी शहरातील अनेक रुग्णालय गाठले, तरीही कोणीही दाखल करून घेतलं नाही.

मुलीला ऑक्सिनजची आवश्यकता असल्याचं एका डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर मुलीचे वडील तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी वण वण फिरले. सगळीकडे फिरल्यानंतर चिमुकलीला जिल्हा रूग्णालयात दाखवलं. तिथेसुद्धा त्यांच्या मुलीला ऑक्सिजन मिळू शकला नाही. अखेर या चिमुकलीनं वडीलांच्या कुशीतच जीव सोडला आहे.

भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. रोज हजारो लोक कोरोनाने मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे स्मशनाभूमीतही मृतदेह जाळण्यासाठी रांगाच रांगा लागल्या आहेत. अनेकांना बेड मिळत नाहीये तर अनेकांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागत आहे.

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! भाजपच्या आणखी एका आमदाराचं कोरोनाने निधन

दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलून चालणार नाही- पंकजा मुंडे

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

मन सुन्न करणारी घटना; पतीचा कोरोनामुळे मृत्यू, पत्नीने उचललं मोठं पाऊल

“लसीकरण मोफत असलं तरी लसीची किंमत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More