बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; ‘या’ योजनेची चौकशी होण्याची शक्यता

मुंबई | 2014 साली महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती होती. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती सत्तेत आली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत दरवर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याची घोषणा झाली होती. त्यासाठी त्यांनी जलयुक्त शिवार ही महत्वकांक्षी योजना आखण्यात आली. आता या योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जलयुक्त शिवार या योजनेची लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडून म्हणजेच एसीबी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. आता माजी अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार यांच्या समितीने या प्रकरणाची चौकशी एसीबीकडून करावी अशी शिफारस केली आहे. ही योजना देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांक्षी योजना असून आता या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता असल्यानं देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का मानला जात आहे.

जलयुक्त शिवार या योजनेचे चौकशी करत असतानाच काही प्रशासनाद्वारे चौकशी करण्यात यावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. काही योजना राबवताना ई निविदा न काढता कामे देण्यात आली. काही योजनांमध्ये तांत्रिक बाबींना बगल देण्यात आली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. विजय कुमार यांच्या समितीने नुकताच आपला अहवाल सादर राज्य सरकारसमोर सादर केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी जलयुक्त शिवार या योजनेवर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी म्हणजेच कॅगने अहवालात ताशेरे ओढले होते. समितीचा अहवाल आता राज्य सरकारच्या हातात असल्यानं आता देवेंद्र फडणवीस यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईमध्ये अवघे ‘इतके’ रुग्ण सक्रिय

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष?, चुकीचे होर्डिंग असतील तर भाजपने काढावेत”

चिंता वाढली! नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात लक्षणीय वाढ

‘या’ वेळेमध्ये सर्वाधिक भारतीय पाहतात पॉर्न, ‘हे’ राज्य आहे पहिल्या स्थानावर!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More