बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राममंदिर ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, आम्हीही राममंदिरासाठी विटा दिल्या आहेत”

मुंबई | अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा गैरव्यवहार समोर आला होता. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला होता. राम मंदिरासाठीच्या भूखंडाचा हा घोटाळा बाहेर आल्यानं देशभर एकच खळबळ उडाली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालकांकडे खुलासा करण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना उत्तर दिलं होतं.

‘शिवसेनेने आता हजरत टिपूचा विचार करावा, राम मंदिराचा विचार करण्यासाठी संघ परिवार आणि हिंदू समाज सक्षम आहे. हे असले भाकड हिंदुत्ववादी, राम मंदिरावर गरळ ओकणारच. शिवसेनेच्या वक्तव्यामागे मागील प्रियंका गांधी यांची प्रेरणा आहे.  राम मंदिराला कसून विरोध करणारे आता अस्तनीतल्या निखाऱ्यांच्या मदतीने मंदिर निर्मितीत कोलदांडा घालतायत’, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली होती. त्यावर शिवसेनेच्या नेत्यानं उत्तर दिलं आहे.

‘भातखळकर, राम मंदिर ही तुमची किंवा भाजपची खासगी मालमत्ता नाही. आम्ही विटा दिल्या आहेत. शंका असेल तर शिवसेना प्रश्न विचारणार आणि संबंधितांना त्याची उत्तरे द्यावीच लागतील’, असं कडक उत्तर शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांनी भातखळकरांना दिलं आहे.

दरम्यान, मागील दोन दशकापासून राजकारणाची उजवी बाजू राहिलेले अनेक पक्ष या राम मंदिराच्या मुद्यावरून सत्तेत आले. पण आता सर्वोच्च न्यायालयाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर देखील आता राम मंदिराच्या जमिनीवरून वाद होत आहेत. त्यामुळे राम मंदिर खरंच श्रद्धेचा विषय आहे की, फक्त राजकारणाचा असा मुद्दा आता उपस्थित होताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

महागाईने आतापर्यंतचे सर्व रेकाॅर्ड मोडले; महागाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका

नाशिकमध्ये कोरोनानंतर ‘या’ आजारांनी काढलं डोकं वर; प्रशासनाच्या चिंतेत भर

अजित पवारांचं सगळं ऐकता मग ‘हे’ का ऐकत नाही?; सुप्रिया सुळेंनी घेतली कार्यकर्त्यांची शाळा

गेल्या 15 दिवसात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पहिल्यांदाच कोरोना रुग्णसंख्या घटली

वाह!!! आता कोरोनाला मास्कच मारणार; पुण्यातील कंपनीने बनवला ‘हा’ जबरदस्त मास्क

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More