बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संजय राठोडांशी ‘ती’ तब्बल 90 मिनिटे बोलली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

पुणे | 7 फेब्रुवारीला पुण्यात टिकटाॅक स्टार असलेल्या 22 वर्षीय तरूणीने आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर ठाकरे सरकारमधील तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर संजय राठोड यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आत्महत्या करण्याच्या तीन ते चार दिवसांआधी तरूणीने संजय राठोड यांच्याशी तब्बल 90 मिनिटे फोनवरून संवाद साधला होता. पोलिसांनी तरूणीचा फोन फाॅरेन्सिक टीमकडे पाठवला होता. त्यानंतर ही माहिती पोलिसांना मिळाली आहे. संजय राठोड यांच्याशी झालेले संवाद तरूणीने आपल्या फोनमध्ये रेकाॅर्ड करून ठेवले होते. त्यामुळे आता संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

तरूणीच्या मोबाईलमधून काही पुरावे हाती लागले आहेत. तरूणीशी बोलत असलेली व्यक्ती राठोडच असल्याचं समजतंय. तिने सर्व संभाषणे रेकाॅर्ड केली आहेत. बंजारा समाजात ही सर्व संभाषणे आहेत. त्याचं भाषांतर सुरू असल्याचं देखील पोलिसांकडून कळत आहे. इंडियन एक्सप्रेसने याबद्दल वृत्त दिलं आहे.

दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये संजय राठोड यांचे सहकारी अरूण राठोड सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याची देखील माहिती समोर येत आहे. आत्महत्येपुर्वी 24 तासाचं फुटेज पोलिसांनी मिळवलं आहे. या माहितीद्वारे पोलीस पुढचा तपास करत आहेत. तसेच याआधी तरूणीच्या मोबाईलचा डाटा देखील फाॅरेन्सिक सायन्सला पाठवण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या-

भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी; महिला हाॅकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

विरोधकांच्या गोंधळामुळे केवळ 18 तास झालं संसदेचं कामकाज; इतक्या कोटींचं नुकसान

‘ही घ्या शिवसेनेच्या बाटग्यांची यादी’; राऊतांच्या अग्रलेखाला नितेश राणेंचं प्रत्युत्तर

‘अनेक संकटे आली पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली’; पवारांकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक

चक दे इंडिया ! भारतीय पुरूष हाॅकी संघाने रचला इतिहास; 49 वर्षानंतर उपांत्य फेरीत धडक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More