Pravin Togadia1 - प्रवीण तोगडियांवर संघ नाराज, पदावरुन हटवणार?
- देश

प्रवीण तोगडियांवर संघ नाराज, पदावरुन हटवणार?

मुंबई | विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करुन संघाची नाराजी ओढवून घेतलीय. आता तोगडिया यांना पदावरुन हटवण्यासाठी संघाने प्रयत्न सुरु केल्याचं कळतंय. 

प्रवीण तोगडिया यांची नुकतीच विहिंपच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली. त्यांची पुनर्नियुक्ती होऊ नये म्हणून मोदींनी प्रयत्न केल्याचं वृत्त होतं. मात्र संघटनेत चांगली पकड असलेले तोगडिया पुन्हा अध्यक्ष झाले. 

दरम्यान, तोगडियांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. संघाने याप्रकरणी फेब्रुवारीमध्ये विहिंपची कार्यकारी बैठक बोलावली असून यावेळी तोगडियांना अध्यक्षपदावरुन हटवलं जाण्याची शक्यता आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा