बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवारांच्या बारामतीत रंगणार रणजी क्रिकेटचा थरार

बारामती | गेली अनेक वर्ष बारामतीच्या क्रिकेट स्टेडिअमवर रणजी क्रिकेट सामना व्हावा, असं बारामतीकरांचं आणि पवारांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आता पूर्ण झालं आहे. येत्या 12 ते 15 फेब्रुवारी च्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट स्टेडिअमवर महाराष्ट्र विरूद्ध उत्तराखंड यांच्यात रणजी सामना खेळवला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामन्याला सुरूवात होईल. बीसीसीआयने या स्टेडियमवर रणजी क्रिकेट सामना खेळवायला परवानगी दिली आहे.

बारामतीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडिअमवर व्हावं, यासाठी पवारांनी अनेक प्रयत्न केले. त्यांनी अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम देखील उभारलं. त्या स्टेडियमचं लोकार्पण भारतरत्न सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, अजिंक्य राहणे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

दरम्यान, बारामतीत रणजी सामना खेळला जाणार असल्याने बारामतीकरांनी आनंद व्यक्त केला आहे. आमचं खूप दिवसांचं स्वप्न सत्यात उतरलंय, अशा भावना बारामतीकर नागरिक व्यक्त करत आहेत.

ट्रेंडिंग बातम्या- 

तू नाही जळालीस, जळाले आमचे संस्कार, सभ्यता आणि संस्कृती…- राजू शेट्टी

हिंगणघाटच्या आरोपीला महिन्याभरात शिक्षा द्या- चंद्रशेखर बावनकुळे

महत्वाच्या बातम्या- 

छातीवर गोळ्या खाईल म्हणणाऱ्या औवैसींना भाजपचं प्रत्युत्तर

मुक्या जनावरावर बळीराजाचं अनोखं प्रेम…; बैलाच्या मृत्यूनंतर बांधली समाधी

…म्हणून ती शांत झाली हे बरंच झालं- नवनीत राणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More