Top News खेळ देश

15 कोटी म्हणजे किती रे भाऊ?, स्वतःवर लागलेली बोलू ऐकून त्याला पडला प्रश्न!

Photo Credit - Twitter/ @BLACKCAPS

चेन्नई | आयपीएलच्या चौदाव्या हंगामात न्यूझीलंडच्या कायेल जेमिसनवर फार मोठी बोली लागेल याची कोणालाही अपेक्षा नव्हती. त्याला संघात घेण्यासाठी राॅयल चॅंलेजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात चुरस होती. अखेर त्याला 15 कोटी रुपयांत आरसीबीने आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे. मात्र, त्याला 15 कोटी रुपये म्हणजे नक्की किती असतात हे माहिती नव्हते.

आयपीएल लिलाव सुरु असताना न्युझीलंडमध्ये रात्र होती. मी उठून माझा फोन बघितला. काही खेळाडूंना लिलावाला यायला आवडत नाही. त्यांना भिती वाटते. परंतु, मी तो पाहण्याचा निर्णय घेतला. एक-दीड तास माझे नाव लिलावासाठी आले नाही. आरसीबीने मला खरेदी केल्यानंतर शेन बाॅडने मला मेसेज केला. अगदी खरे सांगायचे झाले तर 15 कोटी मला माहिती नव्हते, असं त्याने सांगितलं.

अगदी खरे सांगायचे झाले तर 15 कोटी रुपये म्हणजे न्यूझीलंड डॉलर्समध्ये किती असतात, हे मला माहिती नव्हते. मात्र, मला लिलाव पाहताना मजा आली. 15 कोटी रुपये म्हणजे 28 लाख 34 हजार 344 न्यूझीलंड डॉलर्स होतात, असं देखील जेमिसनने सांगितलं.

दरम्यान, आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारीला चेन्नई येथे झाला. दक्षिण आफ्रिकेचा क्रिस माॅरिस हा आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. क्रिस माॅरिसला राजस्थान राॅयल्सने 16.25 कोटीला घेवून आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात नवी नियमावली लागू, जाणून घ्या नेमकी काय आहे

जिल्हाधिकारी असावा तर असा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय!

“नरेंद्र मोदींनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं”

“सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन…हाच आहे काँग्रेसचा तमाशा”

पेट्रोल भरताना तरूणाने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या