जयपूर | देशावरील कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. तसेच लग्नसराईत कोरोनाने धुमाकूळ घातल्याने अनेक लग्नसोहळे लांबणीवर पडलेत. मात्र राजस्थानमध्ये कोरोना व्हायरसच्या काळात नियमांचं पालन न करता लग्न करणं संपूर्ण कुटुंबाला चांगलंच महागात पडलंय. लग्नात सामिल झालेल्या 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय तर एकाचा मृत्यू झालाय.
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात 13 जून रोजी एक विवाह सोहळा पार पडला. लग्नासाठी प्रशासनाकडून लग्नात जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु लग्नात 50 हून अधिक लोक सामील झाले. त्यानंतर लग्नात नवऱ्यामुलासह 16 जणं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं.
कोरोना संसर्गावर प्रभावी नियंत्रणासाठी भीलवाडा मॉडेलची चर्चा देशभरात केली जात होती. यावर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करत आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 अंतर्गत तसंच सामान्य लोकांचं जीवन धोक्यात आणल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
या लग्नात सामील झालेल्या व्यक्तीला पहिल्यांदा 19 जून रोजी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर एकूण 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये एकाचा मृत्यूही झाला. शिवाय आणखी काही जणांना कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.
ट्रेंडिंग बातम्या-
चंद्रकांत पाटलांना पहिल्यांदा चंपा कुणी म्हटलं? अनिल गोटेंनी जाहीर केलं ‘त्यांचं’ नाव
देवेंद्र फडणवीसांना टरबुज्या भाजपमधलेच काही लोक म्हणायचे- अनिल गोटे
महत्वाच्या बातम्या-
इंधन दरवाढीविरोधात 29 जूनला काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन!
राज्यातील ‘या’ भागात पुन्हा लॉकडाउन लागू
‘…तर राज्यात पुन्हा कडक लॉकडाउन लागू करावा लागेल’; उद्धव ठाकरेंचा इशारा