मुंबई | प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरीकरांनी केलेल्या वक्तव्याचा वाद काही केल्या शमन्याचं नाव घेईना. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांचं समर्थन केलं आहे. तर अनेक जण त्यांच्यावर सडकून टीका करत असतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत इंदुरीकरांच्या वक्तव्याबाबत भाष्य केलं आहे.
मी इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. त्यांनी महिलांबद्दल तसं वक्तव्य करायला नको होतं. त्यांची दिवसाला 80 प्रवचनं होतात. ती सगळी जनप्रबोधनाची असतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. मात्र त्यांनी इंदुरीकरांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याचं स्पष्ट दिसतंय.
अत्यंत मार्मिकपणे समाजातील चुकांंवर ते बोट ठेवतात. मी त्यांच्या अनेक किर्तनांना गेलो आहे. इंदुरीकर महाराजांची कीर्तनं समाज प्रबोधनासाठी असतात. त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, एका वाक्यानं त्या माणसाची तपश्चर्या वाया घालवू नका, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी माध्यमांना दिला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
छत्रपती संभाजी राजेंकडून श्रीरंग बारणेंचं तोंडभरून कौतुक; म्हणाले…
सुशिक्षित, संपन्न कुटुंबांत घटस्फोट जास्त होतात- मोहन भागवत
महत्वाच्या बातम्या-
चांगल्या डॉक्टरकडे जाण्याची गरज; नवाब मलिकांचा भाजप नेत्यांना सल्ला
मोर्चा, आंदोलनं करु नका; इंदुरीकर महाराजांचं चाहत्यांना आवाहन
“मोदी मोठे ‘विकासपुरुष’, त्यांच्या आधी कोणीच एवढा विकास केला नाही, नंतरही कोण करणार नाही”
Comments are closed.