नागपूर | सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने 2 एसआयटी नेमल्या आहेत. अमरावती विभागातील घोटाळ्याप्रकरणी एक तर गोसीखुर्द प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी दुसरी एसआयटी नेमण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यापूर्वीच्या सुनावणीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संदिप बाजोरिया यांचा घोटाळ्यात सहभाग आहे का? याबाबत प्रश्न विचारला होता. 3 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते.
सरकारने याप्रकरणी 2 एसआयटी नेमल्या आहेत. आता याप्रकरणी राज्य सरकार न्यायालयात काय उत्तर देतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- सलमान खानला 2 वर्षांची शिक्षा, मात्र तुरुंगात जाणार नाही?
- काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी, इतरांची निर्दोष मुक्तता
- छिंदमविरोधात मोर्चा काढणाऱ्या 160 शिवप्रेमींवर गुन्हा दाखल
Comments are closed.