Top News खेळ

2011 च्या वर्ल्ड कप फायनलवर शंका घेण्याचं कारण नाही- ICC

दिल्ली | 2011 वर्ल्ड कपच्या फायनलची मॅच फिक्स असल्याचा आरोप श्रीलंकेकडून करण्यात आला आहे. या आरोपावरुन सुरु झालेल्या वादावर आयसीसीने अखेरीस आपली प्रतिक्रिया दिली आहे. या मॅचवर किंवा निर्णयावर संशय घेण्याचं कारण नसल्याचं आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे.

2011 वर्ल्ड कपच्या फायनलची मॅच ही नियमाप्रमाणे खेळवली गेली. त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा संशय घेतला जाईल असं कारण समोर आलं नसल्याचं, आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाचे प्रमुख अ‍ॅलेक्स मार्शल यांनी म्हटलंय.

श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी काही दिवसांपूर्वी 2011 वर्ल्डकपची फायनल फिक्स असल्याचा आरोप केला होता. श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा, माजी खेळाडू महेला जयवर्धने यांनी हे आरोप फेटाळले होते. पण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन श्रीलंकन क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणी चौकशी सुरु केली होती.

वर्ल्डकप फायनल फिक्स असल्याचे आरोप झाल्यानंतर श्रीलंका पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. कोणतेही ठोस पुरावे गेल्या काही दिवसांत समोर आले नाही. त्यामुळे श्रीलंकेच्या पोलिसांनी आपला तपास थांबवला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“दिल्लीत इतकं मजबूत सरकार असूनही कश्मीर खोर्‍यात शांततेचा चोथा का झाला?”

फडणवीसांचं स्वप्नभंग झालं म्हणूनच ते अशी वक्तव्यं करत आहेत

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाविरोधी लढ्यात पुणे महापालिकने टाकला टॉप गिअर, आता….

CA परिक्षेबाबत ‘हा’ मोठा निर्णय येण्याची शक्यता…!

जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा…., शासनाची महत्त्वाची घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या