पुन्हा आम्हीच सत्तेत येणार आमचा कोणीही पराभव करू शकत नाही- अमित शहा

नवी दिल्ली | आम्ही 2019 मध्ये केंद्रात पुन्हा पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, आम्ही जो संकल्प केला आहे, त्या संकल्प शक्तीचा कोणी पराभव करू शकत नाही, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. ते दिल्लीत बोलत होते.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक आज दिल्लीमध्ये सुरू झाली आहे. त्यावेळी त्यांनी आम्ही विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या जनधन, उजाला, उज्ज्वला, पीक विमा, आयुषमान भारत आदी कल्याणकारी योजनांवर बैठकीत भर दिला जाणार असल्याचं समजतंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-खडसेंना औरंगाबाद खंडपीठाचा दणका; दमानिया यांच्या विरोधातील FIR रद्द करण्याचे आदेश

-आता डॉ. हाथीची भूमिका साकारणार ‘हा’ कलाकार!

-अकेले शेर को जंगली कुत्ते भी हरा सकते है- मोहन भागवत

-पंकजा मुंडेंच्या कारखान्यावरील कारवाई भोवली; ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलबंन

-हार्दिक पटेलची प्रकृती ढासळली; रुग्णालयात दाखल

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या