बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात, 54 कोटींपेक्षा जास्त लोक लसवंत- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन. संपूर्ण देशवासिय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत आहेत.

देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना, स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांना नमन. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचे देश स्मरण करतो, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात, 54 कोटींपेक्षा जास्त लसवंत, कोव्हिड लस भारतात निर्माण झाली नसती, तर काय परिस्थिती उद्भवली असती विचार करा, असं मोदी म्हणाले. देशात पूर आणि भूस्खलनाच्या दुर्दैवी घटना घडल्यात. या घटनांमध्ये प्रभावित सर्वांसोबत केंद्र सरकार उभं आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उजळणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानासाठी देशवासियांनी काही वेळ टाळ्या वाजवाव्यात, असं मोदींनी सांगितलं.

देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम दिली. म्हणूनच 14 ऑगस्टचा दिवस यापुढे दरवर्षी फाळणी दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल, ज्यांचा मृत्यू झाला त्यांची आठवण केली जाईल, असंही मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहन

आज 75 वा स्वातंत्र्यदिन; पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहन करणार

“कष्टाने मिळालेलं स्वातंत्र्य वाचेल की नाही याची शंका निर्माण करणारं वातावरण सध्या देशात”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

राज्यात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More