बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! लस घेतलेल्या ‘इतक्या’ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

पुणे | मागील काही दिवसांपासून देशात कोरोना (Corona) झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहरातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच आता कोरोनावरील दोन्ही लस घेऊनही पुण्यातील 80 टक्के नागरिकांना कोरोना झाल्याचं उघडकीस आलं आहे.

नव्याने कोरोना झालेल्या 80 टक्के नागरिकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. मात्र, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुणे प्रशासनाने नागरिकांना कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन केलं आहे. तसेच पुढील काही दिवसांत पुण्यात कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे.

पुण्यात 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या दरम्यान रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पाच ते सात दिवसात पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या चारपटीने वाढली आहे. पुण्यात सोमवारी 444 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 2838 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान, आयुक्त मुरलीधर मोहोळ यांनी लवकरच पुणे शहरात कडक निर्बंध लावले जाण्याचा इशारा दिला आहे. पुण्याबरोबरच मुुंबई शहरातही कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या अशीचं वाढत राहिली तर मुंबईत लवकरच लॉकडाऊन लावला जाईल, असा इशारा चहल यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

खुल्लम खुल्ला प्यार!, औरंगाबादच्या रस्त्यावरील तरुण-तरुणीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

‘नितेश राणेंना त्यांच्याच घरात लपवलंय’; शिवसेना आमदाराचा धक्कादायक आरोप

‘या’ गोष्टीचा सनी लिओनीला आजही होतो त्रास, स्वत: केला खुलासा

समीर वानखेडेंच्या बदलीवर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

झाड फेकी प्रकरणावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More