बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र हादरला! एकाच जिल्ह्यात दोन दिवसात 3 शेतकऱ्यांची आत्महत्या

बीड | दोन दिवसांमध्ये 2 तरुण शेतकऱ्यांसह एका वृद्ध शेतकऱ्यानी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील केज, वडवणी, परळी या तालुक्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

बाळासाहेब रामलिंग गित्ते याने 19 तारखेला आत्महत्या केली. तर सिद्धेश्वर धर्मराज फरताडे याने काल 20 तारखेला सकाळी व नागोराव धोंडिबा शिंदे यांनी काल सायंकाळी उशिरा आत्महत्या केली.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे होत्याचं नव्हतं झाल्याने, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अतिवृष्टीने मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं झालं आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरी शासनाची मदत पोहोचली नाही.

आता रब्बीचा हंगाम सुरू होत आहे, यामुळे आता येणारा सणवार कसा करावा ? घेतलेलं कर्ज कुठून फेडावं ? रब्बीसाठी बियानं कुठून आणावं ? वाहून गेलेलं शेत पुन्हा कसदार कसं बनवावं ? या एक ना अनेक संकटाने इथला शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘नरेंद्र मोदींच्या भीतीच्या 35 हजार उद्योजकांनी देश सोडला’; अर्थमंत्र्यांची टीका

लहान मुलांच्या लसीकरणानंतर दिसतात ‘ही’ लक्षणे; तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

‘भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानला जास्त संधी’; मुल्तानच्या सुल्तानचं मोठं वक्तव्य

एनसीबी-एनसीपी वाद पेटला! वानखेडे म्हणतात मी नव्हतोच, मलिकांनी पुरावे दाखवले

“काॅंग्रेसने मला सेक्युलरिझम शिकवू नये, नाना पटोले आणि रेवंथ रेड्डी सारखे नेते…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More